
मि साधारण चार वर्षापूर्वी आपल्या वारजे येथील राहूल पार्क या स्कीममद्ये दोन बेडरूमचा flat खरेदी केला. खरे म्हणजे एक flat पूर्वी असल्याने अजून एक flat घेण्याचा विचार नव्हता.पण हायवे वरून जात असताना मित्राने सांगीतले येथे बाराव्या मजल्यावर flat शिल्लक आहे. विचार केला बघायला काय हरकत आहे. आपल्या साईट office वर चौकशी केली. त्यांनी दोन Bhk चा flat शिल्लक आहे आणि १३५० sq.ft. Area आहे सांगीतले. परत विचार केला सगळीकडे 2 bhk flat साधारण 1030 sq.ft. चे असतात, हा 1350 एरीया म्हणजे लुटमारच आहे. तुमच्या office मधल्या निलीमा madam म्हणाल्या बघा तरी. Flat बघीतला, एकदम आवडला. मोठे आणि रूंद पँसेज, प्रसन्न वाटणारा flat, दोन मोठे टेरेस, भरपूर उजेड आणि वारा. टेरेस मधून समोर दीसणारा मरीन ड्राईव्ह सारखा view. मोठ्या रुम्स, प्रशस्त कीचन कम डायनिंग, लीव्हींग. सर्व सोयी. First site impression एकदम चांगलेच झाले व तो flat आम्ही घेतला. आमचे एकत्र कुटूंब आहे, आम्ही तिघे भाउ आहोत. आमचे flat चे समोरच आपला अजून flat शिल्लक होता, तोही नंतर सात आठ महीन्यात घेतला. नंतर तिसरा flat शिल्लक नव्हता म्हणून निलीमा madam यांनी सांगीतले की तुम्ही बाणेरच्या स्कीममधील flat बघा तरी. तो flat सूद्धा आवडला, area 1350 sq.ft.
छान इलेव्हेशन, भरपूर उजेड, प्रशस्त व आकर्शक passage, आतून नेहमी सारखाच आकर्षक flat, सर्व सोयींनी युक्त. तोही flat आम्ही घेतला. तिन्ही भावांचे flat आपल्या कडे घेतले. कारण आपले flat घेतल्यावर दूसरीकडचे 1020 sq ft. चे घ्यायची इच्छाच होईना. आपली कामाची Quality सूद्धा चांगली आहे, सरळ व्यवहार, लांडी लबाडी नाही, बोलताना मग्रूरी नाही, चांगला स्टाफ ही आपली बलस्थाने आहेत आणि ती आपण या पूढेही जपाल याची खात्री आहे.
आपल्या व्यवसायास व कौटूंबिक आयूष्यास शूभेच्छा.